Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२
राज्यारोहण.

[ सर्ग ५

श्री शिंदे, नृपति तसे बिकानिरीचे
विश्वासू परिचर ते अधीश्वराचे ।
आले, ते प्रथित नबाब रामपूरी
सामोरे प्रतिनिधिच्या सवें पुढारी ॥ ३२ ॥
श्रीरामान्वय-भव हिन्दुजातिसूर्य
मेवाडक्षितिपति, बाहुजातवर्य ।
भूपांचा प्रतिनिधि, आदरार्थ आला
सामोरा, कुशल वदूनि धन्य झाला ॥ ३३ ॥
सम्राट्पदा उचितशा विभवें प्रवेश
दिल्ली-पुरींत करि भूपति सावकाश ।
अश्वावरी बसुनि राजपथें निघाला
आनन्दपूर्ण नयनीं जनिं देखियेला ॥ ३४ ॥
बसुनियां रथीं चक्रवर्तिनी
हळुहळू पर्थी जाय नन्दिनी ।
प्रणति घेत ती सस्मिताननीं
निरखिली सती आदरें जनीं ॥ ३५ ॥
सरमाधवराव शूर शिंदा
सरपरताव नृपालवीर खंदा ।
श्रुत रामपुरीय ते नबाब
तुरगारूढ पुढें, खरा अदाब ॥ ३६ ॥