Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सर्ग ५]
दिल्ली - दरबार.

५१

दिल्ली-पुरींत, इतरत्रहि उत्सवाचे
संभार चालति अनेक परोपरीचे ।
सुस्वागता नृपतिला करण्यास जीं तीं
सोत्कण्ठ सर्व नगरें नृपराज पंथीं ॥ २७ ॥
मुंबापुरीं नृपतिनें करितां प्रवेश
आरंभ हो भरतभूतळि उत्सवास ।
जिंकावया प्रकृति-चित्तचि जैत्रयात्रा
ही वाटली भरतभूत मनुष्यमात्रा ॥ २८ ॥
बहुविध उपचारें थोर मुंबापुरीनें
करुनि विभवयोग्य स्वागता आदरानें ।
प्रथम विदित केली स्वामिभक्ती अपार
प्रमुदित मनिं झाला चक्रवर्ती सदार ॥ २९ ॥
दिल्लीला नृपवर जाय तों जनांनीं
केलेला पथिं सुखसोहळा बघूनी ।
जामाता वधुगृहिं जावया निघाला
ऐसा या प्रकृतिजनास हर्ष झाला ॥ ३० ॥
संराज्ञीसह नृपचक्रवर्ति आला
दिल्लीला, जयजयकार थोर झाला ।
सामोरे प्रतिनिधि, मुख्य कामदार
आले ते प्रणति करीति सोपचार ॥ ३१ ॥