Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०
राज्यारोहण

[ सर्ग ५

भूपाचिया वसतिला अनुरूप हर्म्य
नानाविधोपकरणीं युत आणि रम्य ।
जेथें उणे न पडतील नृपा विलास
होईल जेथहि तया सुखसंनिवास ॥ २२ ॥
ते स्तंभ गोल, पुट त्यांवरती रुप्याचें
त्याच्यावरी कळस सुन्दर सोनियाचे
आंतूनियां भरजरी पट नेसवीले।
ऐसे अनेक पटमण्डप निर्मियेले ॥ २३ ॥
ही जेधवां पटपुरी अतिशुभ्रकान्ती
रक्तांशुंनी उजळिली रविनें प्रभातीं ।
ती शोभली रुचिर अस्फुट - पीतरंगें
कीं निर्मिलीच जणुं कृत्रिम पुष्परागें ॥ २४ ॥
विद्युत्प्रकाश परिकल्पियला सुखार्थ
रात्रौ, तयांत दिसलें स्फुट वस्तुजात ।
त्या गौरवर्ण-किरणीं गमली जनातें
दुग्धींच की बुडविली अवघी पुरी ते ॥ २५ ॥
की निर्मिली कमलपत्र पुढें जुळोनी
किंवा हिमद्रव मुशींत बळें भरोनी ।
नाना तरङ्ग उठले मनिं त्या पुरीची
शोभा बघूनि, कृति धन्यचि कल्पकाची ॥ २६ ॥