Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सर्ग ५]
दिल्ली - दरबार.

४९

ही दिल्ली सकळपुरींत पट्टराणी
भूपातें प्रकृतिजनास ही शिराणी ।
हो योग्य प्रभुवर घोषणा कराया
संमानें प्रभुवर- दर्शनासि घ्याया ॥ १७ ॥
ऐसा करूनि दृढ निश्चय देइ आज्ञा
तत्काल तो प्रतिनिधि स्वजनासि तज्ज्ञा ।
दिल्ली दुजी उठविली पटमण्डपांनीं
त्यांहीं प्रभूस्तव जणूं नव राजधानी ॥ १८ ॥
विस्तार, वैभव, तिची रमणीयताही
केली अलौकिक तिला उपमाच नाहीं ।
तीच्यापुढें मयकृती धरि तुच्छतेला
त्वष्टा जणूं अवतरूनि रची तियेला ॥ १९ ॥
स्वर्गातुनी जणुं अचानक येथे आली
पाताळ फोडुनि धरातलिं की उदेली ।
हे इन्द्रजाल अथवा कृति यक्षिणीची
भांबावली मति तिला बघतां जनाची ॥ २० ॥
क्रीडागृहें, उपवनें, रमणीय वीथी
रम्याकृती रुचिर ती पटवेश्मपंक्ती ।
पाहूनि दृष्टि रमली, अनिमेष ठेली
वडावली, निरखिण्यांतची गुंग झाली ॥ २१ ॥