Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८
राज्यारोहण.

[ सर्ग ५


नृपाज्ञा ही होतां पटुमति नृपाचा प्रतिनिधि
नियोजी स्थानातें उचित करण्या उत्सवविधी ।
तया इन्द्रप्रस्थाविण नच दुजें स्थान सुचलें
प्रजेला सर्वस्वी अभिमत, नृपा तेंचि रुचलें ॥ १२ ॥
धर्माने यमुनातटी, समतळीं, पाहूनि रम्य स्थली
इन्द्रप्रस्थ ह्मणूनियां वसविली जी राजधानी भली ।
सौन्दर्ये तुलितां महेन्द्रनगरी जीच्यापुढे लाजली
सर्वांगीं नटली, पुरींत पहिली, व्यासेंहि जी गायिली ॥१३॥
काळाच्या परिवर्तनांत पडली, ती जीर्णता पावली
भाग्यानेंहि पुनश्च तोमरकुळीं ढिल्लिका जाहली ।
पृथ्वीराज नृपाळ तेथचि बळी ती राज्यधू आकळी
राजश्रीगृहदेहलीच गमली सुक्षत्रियां साउली ॥ १४ ॥
हिंदूंच्या अपकर्षकाळि फिरुनी जी जाहली देहली
खिल्जी - सय्यद -लोदि-मोगलकुलीं भाग्यें प्रतिष्ठापिली ।
यत्कीर्ति स्थिर पंचवीस शतकें या भूतलीं गाजली
दिल्लीद्वार ह्मणूनियां प्रतिपुरीं यत्साक्ष ती राहिली ॥ १५ ॥
हिन्दू यवनांसही प्रिय अशी होऊनि जी राहिली
श्री जीची स्मृतिशेष जाहलि परी कान्ती नसे लोपली ।
वास्तूत्कर्षगुणें प्रजानियमना श्रेयस्करी मानिली
राहे बिरुदावलींत खचिली चक्राधिराजावली ॥ १६ ॥