Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सर्ग ५]
दिल्ली - दरबार.

४७


सिंहासनाधिष्ठित भूप झाला
हें ऐकतां येथिल तत्प्रजेला ।
आनन्द झाला परमावधीचा
घरोघरीं तो दिन उत्सवाचा ॥ ७ ॥
ह्या हिंदु-भूची सुदृढानुरक्ती
पाहून त्याच्या समुदार चित्तीं ।
आधीच जी होति सहानुभूती
आली प्रजेलागि तिची प्रतीती ॥ ८ ॥
अत्यंत दूर स्थित या प्रजेला
तो मौलिसंस्कार पहावयाला ।
येणें असें दुर्घट या विचारें
केला नृपें निश्चय या प्रकारें ॥। ९ ॥
स्वयें पुन्हां दर्शन हिंदु-भूस
देऊनियां तेथ निजप्रजेस ।
स्वमौलि-संस्कार मुखें कथावा
संतोष तीच्या मनिंचा करावा ॥ १० ॥
ऐशा करूनी दृढ निश्चयातें
उद्घोषिला तोचि निजप्रजेतें ।
या प्रीतिच्या भूपतिच्या निदेशें
सारी प्रजा डोललि गाढ हर्षे ॥ ११ ॥