Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४
राज्यारोहण.

[ सर्ग ४

"धैर्यं स्वकर्तव्य तुवां करावें
त्वां ईश्वरादिष्टपथेंचि जावें" ।
अभ्यर्थना मङ्गल गायकांनीं
वाद्यांत ही गायिल मंजुगानीं ॥ ६९ ॥
संस्कार हा यापरि पूर्ण झाला
आनन्ददायी सकला जनाला ।
सामन्तमौली मग त्या नृपाला
अत्यन्तमानें प्रणिपात केला ॥ ७० ॥

बाजे, शिंगें, तुताच्या दणकति पुढतीं, देति लोकां इशारा
तोफांचे बार होती, दचकती अवधे, भूमि हाले थरारा ।
चौखंडीची लढाऊ बघुनिच पथकें शत्रु-पोटीं दरारा
ऐशा या थाटमाटी नरपति परते हर्षला लोक सारा ॥७१॥


 १ The Choir sang, “Be strong and play the man: keep the Commandments of the Lord thy God and walk in His ways."