Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दिल्ली - दरबार.
सर्ग ५.

स्थिर चर अवघें हें विश्व निर्मूनि रक्षी
प्रकट न दिसतां ही सर्व कर्मे निरीक्षी ।
प्रभु सदय जगाचा एकटा सूत्रधार
सुविहित-नियमाने चालवी कारभार ॥ १ ॥
स्फुट वचन वदाया मूकही शक्त होई
गिरिशिखर चढूनि पही पार जाई ।
लवहि हरिकृपेचा लाधतां सर्व कांहीं
सहज घडुनि येई, जें घडेना उपायीं ॥ २ ॥
खचित हरिकृपेचा लाभ झाला ह्मणोनी
ब्रितिश- नृपतिसत्तायोग आला जुळोनी ।
अवगुण दवडाया, जोड व्हाया गुणांची
अभिलषित असे ती संगती सज्जनाची ॥ ३ ॥
सुचिर भरतपुत्रीं राज्य या देशि के लें
परि नच जनतेचें ऐक्य केव्हांहि झालें ।
सुघटित नृपनीती दाखवोनी प्रजेला
प्रकृति-हित कराया ईश्वरी योग आला ॥ ४ ॥