Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सर्ग ४ ]
पंचमजार्जाभिषेक.

४३

किरीट रत्नज्वल कान्तियुक्त
करूनि वेदीवरि मन्त्रपूत ।
ठेवी उपाध्याय शिरीं नृपाच्या
मावे न आनन्द मनीं जनाच्या ॥ ६५ ॥
जयध्वनी जो उठला जनांत
तो तत्क्षणीं व्यापुनियां दिगन्त ।
दुणावला पावुनि सागरान्त
आकाशमार्गे भिनला नभांत ॥ ६६ ॥
शिंगें, तुतान्या, जन वाजवीती
तोफा धडाडां उडती सभोंतीं ।
आनन्द - कल्होळ असा प्रशांत
होतां गुरू बोलिला यथार्थ ॥ ६७ ॥
"ठेवो प्रभू सर्व गुणें वरिष्ठ
तुझ्या शिरीं धर्मयशः किरीट - ।
अभ्यर्थना या प्रिय आशयाची
करूनि आशीर्वच हेंच याची" ॥ ६८ ॥


 १ “God crown you with a crown of glory and righteousness.”