Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२
राज्यारोहण.

[ सर्ग ४

ही अंगुठी सुन्दर माणिकाची
संज्ञाच भूपाल - महापदाची ।
भूपाचिया सव्य अनामिकेंत
घाली गुरु सांगुनियां तदर्थ ॥ ६१ ॥
"ही खूणे जाणें तव वैभवाची
तशीच धर्मस्थिति-रक्षणाची ।
मुद्रा प्रतिज्ञा - परिपालनाची
ही अंगुठी साक्षचि या विधीची" ॥ ६२ ॥
करूनियां शुद्ध पवित्र मन्त्रें
दिलीं नृपाचे करिं दोने वेत्रे
एकावरी क्रूस नृपश्रियेची
संज्ञा तशी नीति- पथाश्रयाची ॥ ६३ ॥
दुजावरी एक कपोत, दावी
की न्यायदण्डीहि दया असावी ।
एकें करण दिलें, दुजानें
भुजास आलम्ब दिला करानें ॥ ६४ ॥


 १ It is the ensign of kingly dignity and of the defence of the Catholic Faith and symbolises his being sealed with the Spirit of promise. The Sceptre with the Cross and the Sceptre with the Dove, "Ensign of kingly power and justice" and "Rod of equity and mercy" were then placed in the King's hands. ३ Glove (हातमोजा ).