Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सर्ग ४ ]
पंचमजार्जाभिषेक.

४१

ते राजलक्ष्मी-विविधोपचार
किरीट-भूषादि यथाप्रचार ।
प्रधान-धर्माधिकृतें कराया
आरंभ केला मग जार्जराया ॥ ५७ ॥
करावया साङ्ग विधान धर्म्य,
क्रूसाधिरूढ क्षितिगोल रम्य ।
देऊनियां भूपतिच्या करांत
निरूपिला त्यांतिल गूढ अर्थ ॥ ५८ ॥
"हीं राजवस्त्रें निजदेहिं लेई
भूगोल हा क्रूसनाथ घेई ॥
प्रभू तुला ज्ञान, विवेक देवो
श्री, वीर्य हस्तीं तव नित्य राहो ॥ ५९ ॥
गोलावरी क्रूस सदैव राही
ह्याचा मनीं सूक्ष्म विचार पाहीं ।
हा ख्रिस्तसत्तचि भूमिगोल
राहे, असा अर्थ पहा सखोल” ॥ ६० ॥


 १ Receive this Imperial Robe and Orb and the Lord your God endue you with knowledge and wisdom, with majesty and with power from on high. And when you see this Orb thus set under the Cross, remember that the whole is subject to the Power and Empire of Christ, our Redeemer.