Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०
राज्यारोहण.

[ सर्ग ४

शास्त्रे, ह्मणोनी गुरु जार्जया
प्रवृत्त तो धर्मविधी कराया ॥ ५२ ॥
प्रधानधर्माधिकृतें नृपाचें
तें खड्ग मत्रा जपुनी स्ववाचे ।
वेदीवरी नेउनि ठेवियेलें
भूपाल-भृत्यांप्रति अर्पियेलें ॥ ५३ ॥
त्यांहीं नृपाच्या कसलें कटीस
तें खड्ग, भूपें करुनी विकोष |
पुनश्च वेदीवर अर्पियेलें
देऊनियां निष्क्रय सोडवीलें ॥ ५४ ॥
किरीटसंस्कार नृपा अशेष
हो, तोंवरी तें धरिलें विकोष ।
नृपापुढे खड्ग, तसाचि ठेला
आचार तो पूर्वजिं पाळियेला ॥ ५५ ॥
खड्गार्पणानन्तर भूपतीतें
महार्ह वस्त्रें गुरुनें स्वहस्तें |
समर्पिलीं तीं परिधान अङ्गीं
केलीं नृपें सादर या प्रसङ्गीं ॥ ५६ ॥


 १ The Archbishop of Canterbury.