Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सर्ग ४ ]
पंचमजाजभिषेक.

३९

भूपें प्रतिज्ञा करितां, क्रमानें
अभ्यंग आरंभियला गुरूनें ।
जामा नृपाचा बहु आदरानें
तो काढिला तत्परिचारकानें ॥ ४८ ॥
नृपावरी सुन्दर आतपत्र
अमीर चौधे धरुनी कृतार्थ ।
झाले, सुपर्णाकृति पात्र, दर्वी
आणूनियां सन्निध एक ठेवी ॥ ४९ ॥
त्या भाजनांतूनि यथोक्त-मानें घेऊनियां तेल पुरोहितानें ।
शिरीं, उरीं, हस्ततलीं नृपातें
अभ्यंजिलें रेखुनियां क्रुसातें ॥ ५० ॥
अभ्यंजनानन्तर त्या गुरूला
लवूनि भूपें प्रणिपात केला ।
गुरूहि आशीर्वचनें दूनी
भूपास संतोषवि गोडवाणी ॥ ५१ ॥
दण्डावया दुर्जन, सज्जनांतें
पाळावया खड्ग दिलें नृपातें ।


 १ The Archbishop of Canterbury. २ Eagle-shaped ampula. The sword with which the King is girded is a symbol "for the terror and punishment of evil-doers and for the protec- tion and encouragement of those that do well."