Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६
राज्यारोहण.

[ सर्ग ४

मागें तयाच्या राथं राजमाता
वैधव्यदुःखाहृतलोकचित्ता ।
अश्वावरी जर्मन चक्रवर्ती
ज्याची असे गाजत भव्य कीर्ती ॥ ३५ ॥
चौखंडिचे अन्यहि भूमिपाल
ब्रितानिया - राजकुल-प्रवाल |
घोड्यावरी बैसुनि येति मागें
श्रीजार्ज - भूपाल-ढानुरागें ॥ ३६ ॥
ऐशापरी वेस्त - मिनिस्तरास
येतांचि तो राजकुलावतंस |
सर्वांपुढें चालत जाय राज्ञी
संवेष्टिली तत्परिचारकांनीं ॥ ३७ ॥
मागें तियेच्या उमराव मानी
तीं राजचिह्ने स्वकरीं धरोनी ।
तिघे तिघे चालति सावकाश
करूनि कालोचित रम्य वेष ॥ ३८ ॥
एकाचिया हातिं नृपाल-शस्त्र
दुजा स्वहस्तीं धरि भूपवेत्र ।
किरीट नेई तिसरा अमोल
चौथा तयामागुनि हेमगोर्ले ॥ ३९ ॥


१ Sword of State. २ Sceptre. ३ Crown. ४ Orb.