Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सर्ग ४]
पंचमजाजभिषेक.

३५

त्यामागुतीं भारत-वर्ष - भूप-
किशोर - सेना अति सुखरूप ।
येतां क्षणीं प्रेक्षकसंधिं मोदें
प्रशंसिली ती करताल-नादें ॥ ३० ॥
अनेक मानव्यपदेशधारी
अश्वावरी बैसुनि एक हारी ।
अनेक योद्धे रणरङ्गधीर
ज्यां पाहुनी प्रेक्षकिं हर्षपूर ॥ ३१ ॥
त्यांमागुती ये रथ सोनियाचा
जो भासला केन्द्रचि उत्सवाचा
जयध्वनी त्या बघतां उदेला
तो फोडुनी व्योमकटाह गेला ॥ ३२ ॥
रथास त्या ओढत शुभ्रवर्ण
वाजी सहा उन्नतचारु- कर्ण
शिरःस्थ तें चामर मन्द हाले
ते चालतां सुंदर अश्व डौलें ॥ ३३ ॥
तें राजदम्पत्य रथीं विराजे
तत्कालिंचा वेष तयास साजे ।
मन्दस्मितें शीर्ष - विभूषणातें
स्पर्शनि घेई जनवन्दनातें ॥ ३४ ॥


१ The Imperial Cadet corps.