Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सर्ग ४ ]
पंचमजाजभिषेक.

३७

वे एक तें पावन धर्मपुस्तं
असे दुजा काचपात्रहस्त ।
थाटी तिजा एक करांत घेई
पाठीं तयाच्या नृपराय येई ॥ ४० ॥
एकेक या माङ्गलिक प्रसङ्ग
धर्मोपदेष्टा नृपपार्श्वभागीं ।
चाले, जणो होउनि मूर्तिमन्त
प्रताप, सद्धर्मचि देति हात ॥ ४१ ॥
महार्ह शीर्षण्य शिरीं झळाळे
तें शोण चीनांशुक पायेिं लोळे
सुरम्य वेषें नृप शोभला तो
मागून देवायतनांत येतो ॥ ४२ ॥
त्या पाहतां गायकचक्रिं केला
आरम्भ त्या मङ्गल-गायनाला ।
“जाऊं प्रभूच्या गृहिं" हाच भाव
धरूनियां मङ्गलगीतराव ॥ ४३ ॥
निजासनीं भूपति आणि राज्ञी
तीं बैसतां तत्परिचारकांनीं ।


१ The Bible. २ Chalice. ३ Paten. ४ Bishop. ५ The Choir sang as the procession entered, “We will go into the house of the Lord.”