Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४
राज्यारोहण.

[ सर्ग ४

शृंगारिली लंदन - राजधानी
पौरीं प्रसङ्गोचित-मोदचिन्हीं ।
अनेक सौन्दर्य - चमत्कृतींहीं
विडंबियेली अमरावती ही ॥ २५ ॥
गुड्या पताका-ध्वज- तोरणांनीं
आच्छादिला सूर्य जसा ढगांनीं ।
पदोपदीं भूपति- धन्यवाद
स्वर्णाक्षरी ऋणपदीं निबद्ध ॥ २६ ॥
देवालयीं मौलिनिधान कार्य
करावया भूपति तो सभार्य ।
जाणार ज्या ज्या पथि, तेथ उच्च
क्षार्थ केले जनि थोर मंच ॥ २७ ॥
महोत्सवाचा दिन नेमियेला
उजाडतां वाट पहात ठेला ।
यात्रापथ भूपतिच्या अशेष
सोत्कण्ठ मंचीं जन निर्निमेष ॥ २८ ॥
वाद्ये अनेक प्रतिचीं पुढारां
त्यां मागुतीं तीं पथकें झरारां ।
चौखंडिचीं भूपतिच्या दळाची
साक्षी तयाच्या गुरु वैभवाची ॥ २९ ॥