Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सर्ग ४ ]
पंचमजाजभिषेक.

३३


अनेकभाषीहि अनेकवेषी
अनेकदेशीहि अनेकवंशी ।
एकत्र त्या मानवजाति झाल्या
प्रदर्शनार्थी जणुं आणियेल्या ॥ २० ॥
न देश तो जेथिल लोक तेथें
आले न आनन्दमहोत्सवातें ।
सूक्ष्माकृती की अवनीच त्यांनी
ती भासली लंदन - राजधानी ॥ २१ ॥
महाप्रतापी परकीय राजे
चरित्र ज्यांचें इतिहासिं गाजे ।
घेऊनि आले परिवार तेथ
जार्जप्रभूच्या अभिनन्दनार्थ ॥ २२ ॥
सामन्त, भूपाल, जनाग्रगण्य,
नीतिज्ञ, योद्धे, अभिजात अन्य ।
शिल्पी, कवी, सूरि, धनी, वदान्य
या उत्सवा येउनि होति धन्य ॥ २३ ॥
आले सहस्रावधि कोस दूर
लक्षावधी द्रव्य करूनि चूर ।
राज्याधिरोहोत्सव हा अपूर्व
पहावया उत्सुक लोक सर्व ॥ २४ ॥