Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२
राज्यारोहण.

[ सर्ग ४

आलें तयाला बहु तांतडीचें
बोलावणें श्रीहरिच्या घरींचें
केलें तयें केवळ न प्रजेला
परंतु शोकाकुल या जगाला ॥ १५ ॥
व्रतें पित्याचीं जनिं चालवाया
तद्राजलक्ष्मी वरि जार्जराया ।
ब्रितानिया-त्री खरें कराया
सुराज्य-सौख्या जनतेस द्याया ॥ १६ ॥
किरीट-भूषा विधियुक्त कमें
आदेशिली भूपतिला स्वधर्मे ।
ह्मणून आज्ञा सुटली नृपाची
तत्सिद्धता सर्व करावयाची ॥ १७ ॥
होतांचि आज्ञा, दिननिश्चयातें
करूनियां, या नव उत्सवातें ।
निमंत्रिले मत्रिजनीं विदेश्य
भूपांस तैसें जनताग्रणींस ॥ १८ ॥
संभार या अप्रतिमोत्सवाचा
वानूं किती ? तेथ चले न वाचा ।
असा समारंभ कधीं न डोळां
कोठेंहि कोण्या जनिं पाहियेला ॥ १९ ॥