Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सर्ग ४ ]
पंचमजार्जभिषेक.

३१


झाली पवित्राचरणें स्त्रियांना
आदर्श तैशी इतरां नृपांना ।
तद्राजनीती उपमान झाली
तद्वंशजा प्रेरक तीच ठेली ॥ १० ॥
स्वर्णाक्षरांनीं त्रितिशेतिहासा
ती लेखवूनी परलोकवासा- ।
गेली सती ठेवुनि कीर्तिदेहा
तिच्या गुणीं चित्त धरी विमोहा ॥ ११ ॥
मागूनि तीच्या सुत एदवर्द
सिंहासनाधिष्ठित हो सुबुद्ध ।
मातेचिया शिक्षणिं वाढलेला
आदर्श तो अन्य नृपांस झाला ॥ १२ ॥
न्यायें प्रजा पाळुनि भक्ति तीची
संपादुनी प्रीति नृपान्तरांची |
अग्रेसरत्वा नृपमंडलांत
तो पावला स्वल्पदिनावधींत ॥ १३ ॥
नांदो सुखें सर्व मनुष्यजाती
धरूनियां भाव असा स्वचित्तीं ।
संग्रामवार्ता जागं होउं नेदी
तो " शान्तिचा मित्र" अशी प्रसिद्धी ॥ १४ ॥