Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०
राज्यारोहण.

सर्ग ४

एकाहुनी एक नृपाल थोर
नीतिज्ञ मन्त्री, चरितें उदार ।
योद्धेहि तैसे रणरङ्गधीर
प्रजेत विद्याविनयप्रचार ॥ ५ ॥
सर्वाङ्गसामर्थ्य असें जयेला
दिलें परेशें मनुजोन्नतीला ।
ती कां न राष्ट्रांत पुढें सरावी ?
सर्वोहि राष्ट्रां प्रिय कां न व्हावी ? ॥ ६ ॥
असो, अशा सद्गुणसन्निपात
ब्रितानिया उन्नतिमार्गि होती ।
त लाभली तीस हरिप्रसादें
व्हिक्तोरिया संस्तुत धन्यवादें ॥ ७ ॥
चौसष्ट वर्षे प्रकृतीस तीनें
दयायुतें पाळिलें नयानें ।
केली तयेनें स्वयशासमान
ब्रितानियेची चढती कमान ॥ ८ ॥
होती प्रजेलागि जशी सुराज्ञी
तशी सती ती पतिला सुपत्नी ।
होती जशी ती स्वसुतां सुमाता
तशीच ती वत्सल हो अनाथा ॥ ९ ॥