Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पंचमजाजभिषेक.
सर्ग ४.
(श्लोक)

सौराज्यानें सुखित जनता पाहुनी दृष्ट होई
जीचे राज्यावर ह्मणुनियां सूर्य अस्ता न जाई ।
कीं सौराज्ये सुख वितरणें पुण्य हें मानितात
देव स्वर्गी, ह्मणुनि करिती यापरी पक्षपात ॥ १ ॥
प्राज्या राज्या बघुनि ह्मणतो लोक सारा अगाई
स्वातंत्र्याच्या नृपसरणिची मानिली लोकं आई ।
नौसामध्यें उचित अभिधा "स्वामिनी सागराची "
राष्ट्रें सारीं करितिच जिच्या लालसा मित्रतेची ॥ २ ॥
स्वयें सुराज्या उपभोगणारी
सौराज्य अन्याप्रति अर्पिणारी ।
राजन्वती उत्तमभूपयोगें
ब्रितानिया धन्य सुभाग्य- भोगें ॥ ३ ॥
शुक्लेन्दुची नित्य कलाभिवृद्धी
तशी जयेची प्रतिवर्ष ऋद्धी ।
सहस्रवर्षावधि होत आली
ब्रितानिया दुर्लभ-भाग्यशाली ॥ ४ ॥