Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८
राज्यारोहण.

[ सर्ग ३

जया योगें हा सुदिन पाहियेला
दिलें आलिङ्गन तया कृष्णजीला ।
मौल-सामन्तें उपायनें दिधलीं
नृपें स्पर्शनियां तींच परत केलीं ॥ ४५ ॥
भूरि दिधली दक्षिणा ब्राह्मणांतें,
अन्न आच्छादन दीन दुर्बलांतें ।
पातला जो जनसंघ उत्सवाला
यथामानें तो नृपें तोषवीला ॥ ४६ ॥