Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सर्ग ३ ]
युधिष्ठिराभिषेक.

२७

अशा नादव्यतिकरीं अन्तराळीं
बसलि अमरांची स्वर्ग कानटाळी ।
धर्मराज्यारोहणें हर्ष झाला
परोपरिनें प्रकृतिंनीं व्यक्त केला ॥ ४० ॥
पुढें सिंहासन सोडुनियां खालीं
भूप आला, सर्वत्र शान्ति झाली ।
भूप राज्ञीसमवेत उभा ठेला
शपथ त्यानें सद्गदित रखें केला ॥ ४१ ॥
"स्मरुनि चित्तीं ब्रह्मादिदेवतांला
महाभूतांतें, अष्टलोकपालां ।
चतुर्वर्णी, सत्यासही स्मरोनी
ईश्वरातें प्रार्थितों मी नमूनी ॥ ४२ ॥
धर्ममूलें न्यायेंच जोडियेलें
तया न्यायें तें राहुं पाळियेलें ।
राज्य माझ्या करिं हीच कृपा भाकी
मजसि द्यावें साहाय्य सर्व लोकीं" ॥ ४३ ॥
अशा शपथातें करुनि आदरानें
वन्दियेलें ऋषिगणा भूपतीनें ।
भक्तिपूर्वक कुन्तीस, पितृव्यातें
विदुरगान्धारीप्रभृति गुरुजनातें ॥ ४४ ॥