Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६
राज्यारोहण.

[ सर्ग ३

तिलक केला धर्मास ऋषिगणांनी
द्रौपदीलाही मिलित- कुलवधूंनीं ।
उभयतांची मग काढियली दृष्ट
पुरन्ध्रींनीं लाविलें गालबोट || ३५ ॥
व्यासमुनिंनीं मग एक रत्नखचित
मुकुट मत्रानें स्वयें करुनि पूत ।
स्वकरिं भूपाच्या शिरीं ठेवियेला
अलङ्कारीं तदेह भूषवीला ॥ ३६ ॥
छत्र धरिलें नृपशिरीं वायुपुत्रे,
अर्जुनानें धरियलीं राजशस्त्रें ।
नकुल सहदेवीं व्यजन चामरातें
ढाळियेलें नृपशिरीं आत्महस्ते ॥ ३७ ॥
मुकुट राजाच्या शिरीं व्यासमुनिंनीं
ठेवितांक्षणिं तया सभास्थानीं ।
“धर्मसम्राड् जय जय !” ध्वनि उदेला
तोच पौरीं शतगुणित पथीं केला ॥ ३८ ॥
वेदमत्राशीर्वाद ऋषिजनांचे
मङ्गलार्तिक्यध्वनिहि पुरन्ध्रींचे ।
मधुर तैसे स्तुतिपाठ मागधांचे
तारमन्द्रस्वन शंखकाहलांचे ॥ ३९ ॥