Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४
राज्यारोहण.

[ सर्ग ३

तीर्थ-सलिलें शत कलश पूरियेले
सोनियाचे मांडून ठेवियेले ।
विविध अभिषेकद्रव्यभार हातीं
येइ ऐसा मांडिला त्यांसभोंतीं ॥ २५ ॥
मंडपाच्या पश्चिमद्वारिं आला
भूपतीचा रथ, तदा द्रौपदीला ।
हात देउनि उतरून रथाखालीं
कृष्ण घेई, ऐशीच सभ्य-शैली ॥ २६ ॥
धर्म खाली उतरतां उभे ठेले
सभ्य, सामोरे मौल भूप आले ।
अग्रभागीं घेऊनि राजदण्ड
धौम्य चाले, जयघोष हो प्रचण्ड ॥ २७ ॥
तयामागें श्रीकृष्ण महातेजा,
सवें घेउनि कृष्णेस धर्मराजा ।
भीम अर्जुन चालती नृपामागें
तयां मागुति सापत्न बन्धु दोघे ॥ २८ ॥
बादरायण-मुनि- धौम्य - वामदेव-
प्रभृति आले द्विज सर्व सुप्रभाव ।
तीं संमानुनि धौम्य उपाध्याया-
करविं करवीलें सर्व धर्म्य कार्या ॥ २९ ॥