Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२
राज्यारोहण.

[ सर्ग ३

नियोजूनी हय चार, सुवर्णाच्या
रथीं बैसुनि मागुती नृपालाच्या ।
सात्यकीच्या समवेत कृष्णनाथ
जाय सर्वाचे नमस्कार घेत ।। १५ ।।
अग्रभागी दळभार थोर चाले
तयें शेषासह भूमिगोल हाले ।
 वाद्यघोषे दशदिशा बधिर होती
बंदि मागध नृपगुणा संस्तवीती ॥ १६ ॥
जागजागीं होतसे मङ्गलार्ती
पुष्पवर्षे झांकली पादपंक्ती ।
विप्र आशीर्वच देति, सान बाला
शालिवर्षे पूजिती भूमिपाला ॥ १७ ॥
जिच्या उपदेशें अचळ धर्मनिष्ठा
पाण्डवांची जी सत्कुलप्रतिष्ठा ।
रथीं बैसुनियां शुद्ध सत्त्वमूर्ती
सुभद्रेसह चालली सती कुन्ती ॥ १८ ॥
तिच्या मागुति जाय तो सत्त्वधीर
विदुर, वदला जो कुरूंस नीतिसार ।
तयामागें सामन्त सान थोर
पादचारी जनसंघही अपार ॥ १९ ॥