Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सर्ग ३ ]
युधिष्ठिराभिषेक.

२१

नगरिं शुभ वेळा पाहुनी प्रवेश
नृपें केला पाळुनी गुरुनिदेश |
वानितां ह्या स्वारिचा थाट कविही
थकुनि गेले, मज पाड तेथ नाहीं ॥ १० ॥
झूल पाठीवर कसल भरजरीची,
भाळिं पानें लटकलीं जडावाचीं ।
उभयशृंगें मढविलीं सोनियानें
कनकघण्टादिक कण्ठि विविध लेणें ॥ ११ ॥
असे षोडश वृष गौरवर्ण, पीन
रथा जोडियले वयें समसमान ।
धौम्यगुरुला उजवीस बैसवोनी
धर्म बसला डावीस बसे राणी ॥ १२ ॥
भीम सारध्या करी आदरानें,
श्वेत धरिलें करिं छत्र अर्जुनानें ।
नकुल सहदेवीं व्यजनचामरांतें
करीं वारुनि सेविलें स्वबन्धूतें ॥ १३ ॥
पुढें शिबिकायानांत पितृव्यातें ।
सपत्नीका बसवोनि नृपें हातें ।
धाडिलें प्रणिपात त्यां करोनी
स्वयें त्यांतें बहुसाल आदरोनी ॥ १४ ॥