Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०
राज्यारोहण.

[ सर्ग ३

ग्रीष्मता संतप्त मृगी झाली
वटच्छाया पाहून मनीं धाली ।
कौरवांच्या दुर्नयें त्रस्त तैशी
प्रजा डुलली पावूनि सुराज्यासी ॥ ५ ॥
धर्मराजा अभिषिक्त कधीं पाहूं ?
तया वंदुनि कृतकृत्य कधीं होऊं ? ।
अशी उत्कण्ठा प्रजाजना झाली,
धन्य राजा तो धर्म भाग्यशाली ॥ ६ ॥
प्रजेचा हा अभिलाष आकळोनी
प्रजापालन विधियुक्त हो ह्मणोनी ।
धौम्यगुरुंनीं अभिषेक मत्रयुक्त-
करायातें योजिला शुभ मुहूर्त ॥ ७ ॥
राजपुरुषीं संभार सिद्ध केला
इतर भूपां संदेश पाठवीला ।
श्रौत पारंग विप्रांस आणवीलें,
नगर नागरिक सर्व शोभवीलें ॥ ८ ॥
सडा संमार्जन करुनि राजमार्ग
विविध चित्रांनीं बाह्य भित्तिभाग ।
गृहद्वारादिक गुड्या पताकांनीं,
चौक सजवीले दिव्य तोरणांनीं ॥ ९ ॥