Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युधिष्ठिराभिषेक.
सर्ग ३.
(दिंडी)

कृष्ण योगीश्वर जेथ उभा पाठीं
सज्ज चढवुनि धनु जेथ तो किरीटी ।
अढळ तेथें श्री, विजय, भूति,
नीती तिन्हीं काळीं सत्य हे भगवदुक्ती ॥ १ ॥
कृष्णसाहाय्यें वधुनि कौरवांसी
जयें लंघियला समर - वारि-राशी ।
युधिष्ठिर तो प्रत्यक्ष
धर्ममूर्ती भरत-भूतलिं जाहला चक्रवर्ती ॥ २ ॥
वैरेवृक्षाचीं सकळ मुळें पाळें
खणुनि निष्कण्टक राज्य सर्व केलें ।
आधि भूपाच्या सर्वही निमाल्या
तशा सौराज्यें प्रजा हृष्ट झाल्या ॥ ३ ॥
पाठिराखा श्रीकृष्ण पाण्डवांचा
असुनि अन्याया वाव मिळे कैंचा ? ।
धर्म चालवितां राज्य कारभारा
दुराचारा कोठून मिळे थारा ? ॥ ४ ॥