Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८
राज्यारोहण.

[ सर्ग २


दिव्य सभास्थानिं अशा सिंहासन मध्यभागिं मांडियलें ।
सामन्तपौरसाक्षिक विधियुत अभिषेककार्य तें केलें ॥५९॥
मन्वभिषेकं मुकुट जो ब्रह्म्याने रत्नखचित कल्पियला ।
पारंपर्यागत तो पुरोहितें रामशीर्षि ठेवियला ॥ ६० ॥
मग इतर ऋत्विजांनी अन्य अलङ्कार राघवा दिधले ।
शत्रुघ्झें रामशिरीं धवल शुभद आतपत्र तें धरिलें ॥ ६१ ॥
चंवरी सुग्रीवकरी एक, दुजी त्या विभीषणाहातीं ।
ते मशकवारणमिषें प्रकृतिजना राममूर्ति दाखविती ॥ ६२ ॥
अभिषेककार्य सारें सारुनियां साङ्ग गुरु वसिष्ठानें ।
दिधला निरोप विप्रां संमानुनि भूरि दक्षिणादानें ॥ ६३ ॥
सामन्तातें देउनि वस्त्रालङ्कार भूषणें उचित ।
बहु संमानें त्यांना निरोप दिला करूनियां सुखित ॥ ६४ ॥
अतिथींस मिष्ट भोजन, दुबळ्यांतें अन्नवस्त्रही दिधलें ।
पौरां जानपदांतें विविधोपार्थी उमोप तोषविलें ॥ ६५ ॥
रामा जगदभिरामा, पूरितकामा, परार्ध्यगुणधामा ।
कविवरवागारामा, नृपालसोमा, तपस्विविश्रामा ॥ ६६ ॥
अभिषिक्त पूर्वजांच्या सिंहासनं बघुनि जाहला सकलां- ।
आनन्द, त्यास कोठें पारावार क्षमातलीं नुरला ॥ ६७ ॥