Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सर्ग २ ]
रामाभिषेक.

१७


जल पंचशतनद्यांचें इतर कपींनीं तसेंच आहरिलें ।
श्रम कोठुनि त्यां? ज्यांनीं अब्धिस एक्या उडींत लंघियलें ॥४९॥
तीर्थजलें हीं येतां शत्रुघ्झें इतर सिद्धता केली ।
आमन्त्रणे वसिष्ठा, मत्रिजनां, बान्धवांसही दिधलीं ॥ ५० ॥
पाचारिले वसिष्ठे कात्यायन, वामदेव, जाबालि ।
काश्यप, गौतम, विजय श्रोतीं ज्यांनीं प्रसिद्धि मेळविली ॥५१
त्यांसमवेत वसिष्ठे प्रयतें तैसेंच तें उपक्रमिलें ।
अभिषेककार्य विधियुत जैसें ग्रंथांत तें उदाहरिलें ॥ ५२ ॥
श्रीरामा रत्नानि सीतादेवीसमेत बैसविलें ।
अभिषिञ्चिलें सुवासिक मंत्रपवित्रे अमोघ तीर्थजलें ॥ ५३ ॥
वसुंनी ज्या कल्पानें स्वर्गी अभिषेक वासवा केला ।
रामाभिषेक समय पुरोहितें तोच कल्प आदरिला ॥ ५४ ॥
इन्द्रास सुरविशेषीं अभिषेक जसा पृथक् पृथक् केला ।
रामाभिषेकसमयीं प्रजाजनीं क्रम तसाच तो धरिला ॥५५॥
आधीं ऋत्विग् ब्राह्मण यांकरवीं गुरु नृपास अभिषेकी ।
मग कन्यामंत्रिजनीं, त्यांमागुति बाहुजीं, वणिग्लोकीं ॥५६॥
पृथगभिषेकें संमति विशद जशी जाहलीच देवांची ।
अनुरक्ति श्रीरामीं उद्घोषित विविधजाति मनुजांची ॥५७॥
हेमस्तम्भ केलें रत्नखचित इन्द्रनीलमणिरचित ।
पटल गगनसें गमलें विविधोज्वलकान्तिरत्नतारकित ॥ ५८ ॥