Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६
राज्यारोहण.

[ सर्ग २


लाजा फेंकुनि बाला सुस्वागत करिति रामभूपाला ।
ओवाळुनि नीराजन मङ्गल रामासि वांछिती महिला ॥ ३९ ॥
प्रतिहिं मंगलात पुरन्ध्रिवर्गे नृपास जी केली ।
ती सूचक जणुं झाली कीं आर्ती प्रकृतिची लया गेली ॥४०॥
फेंकित सर्वदिशांसी विधुसा आल्हादकारि किरणांतें ।
श्रीरामचन्द्र आला इक्ष्वाकूंच्या सुरम्य भवनातें ॥ ४१ ॥
तेजस्वी भरत तदा सुग्रीवा वानराधिपास वदे ।
अभिषेकसिद्धता बा करण्या आज्ञा त्वदीय दूतां दे ॥ ४२ ॥
सुग्रीवें सोन्याचे चार कलश वानराधिपां दिधले ।
बदला, "जा आणा हो भरुनी हे चार अब्धिच्या सलिलें ॥४३ ॥
गरुडाच्या वेगें मग केलें उड्डाण वानरेन्द्रांनीं ।
सागरनदीनदोदक एक्या रात्रीत आणिलें भरुनी ॥ ४४ ॥
पूर्वसमुद्राचें जल सोन्याच्या रत्नखचित कलशांत ।
भरुनि सुषेण कपीनें आणियलें तेथ चार यामांत ।। ४५ ।।
जल दक्षिणोदधीचें कलश भरुनि आणितां न ऋषभास ।
झाले प्रयास, कोठुनि, असतां प्रभुसेवनांत उल्हास ? ॥ ४६ ॥
पश्चिम महार्णवाचें जल आणियले भरून वेगानें ।
कर्पूर-रक्तचन्दन-सुवासित स्वर्णकलशि गवयानें ॥ ४७ ॥
उत्तर रत्नाकरिंचें शीत उदक रत्नकुम्भि मारुतिनें ।
आणिलें, अनिलसुता विक्रमवेगांत केंवि होय उणें ? ॥ ४८ ॥