Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सर्ग २ ]
रामाभिषेक.

१५

बघण्या अभिषेकोत्सव जन तेव्हां लोटले असंख्यात ।
मुंग्यांची रवण तशी रीघ मिळेना मुळींच मार्गीत ॥ २९ ॥
फुललें, डुललें सारें जनसंमदें विशाल तें नगर ।
ये पारिजातकातें वर्षाकालांत जेंवि कुसुमभर ॥ ३० ॥
सुंदर ललनावदनें प्रतिवातायनिं तटस्थ तीं ठेलीं ।
श्रीरामवदनचन्द्रोदयकांक्षी उत्पलेंच तीं गमलीं ॥ ३१ ॥
त्या स्मित सुंदरवदनीं मुकुलितकमलीं तडागसें गमलें ।
प्रतिवातायन, त्यातें बघतां मार्गस्थ - नेत्र-युग रमलें ॥ ३२ ॥
उच्चाट्ट, चन्द्रशाला, गृहवलभी, वृक्ष राजपर्थिं निकट ।
'गमले वदनश्रेणी रेखुनि कीं निर्मिलेच चित्रपट | ३३ ॥
सादर विप्राशीर्वच, सप्रेम जनप्रणाम तो घेत ।
जयघोषे अभिनन्दितपुरमार्गे जाय धन्य नरनाथ ॥ ३४ ॥
कुतुकें ईक्षित शिशुंनीं, साञ्चर्य प्रौढ हप्त वीरांनीं ।
सादर सामन्तांनीं, भक्तिपुरःसर समग्र पौरजनीं ॥ ३५ ॥
सोत्कण्ठ प्रमदांनीं, सुतवात्सल्यें तसा पुरन्ध्रींनीं ।
स्नेहें आप्तजनांनीं, गाढ प्रेमें त्रिवर्गजननींनीं ॥ ३६॥
श्रीरामाचें दर्शन प्रवेश-यात्रेत ज्या जनां घडलें ।
त्यांना गमलें तेव्हां डोळ्यांचें आज पारणे फिटलें ॥ ३७ ॥
केली जी कुसुमांची वृष्टी प्रतिमार्गि पौरजानपदीं ।
घनदाट शेज झाली पडुनी ती रामरथतुरङ्गपदीं ॥ ३८ ॥