Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सर्ग १]
इन्द्राभिषेक.

११.

वेदोक्तें या विधिनें पूर्वी जनमेजयादि राजे ।
अभिषिञ्चियले त्यांचें सद्यश कथापुराणीं गाजे ॥ ५९ ॥
या देशाला भरतखण्ड हें नांव लाधलें, पूर्वी ।
स्वविक्रमें पाळिली जयानें सागरान्त ही उर्वी ॥ ६० ॥
त्या सम्राजा भरता झाला या विधिनें अभिषेक ।
धार्मिक हा संस्कार नृपाला प्रजेसही दे हरिख ॥ ६१ ॥