Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०
राज्यारोहण.

[ सर्ग १

ही चौपाई दाट विणावी मोळाच्या दोरीनें ।
व्याघ्रेचर्म त्यावरि पसरावें आसन साक्षेपानें ॥ ५१ ॥
करुनि केंस वर तोंड तयाचें पूर्व दिशेस करावें ।
कीं राजाच्या शौर्याचें तें सूचक जनासि व्हावें ॥ ५२ ॥
आसन्दीच्या पाठीमागें तोंड करुनि पूर्वेस ।
उजवा गुडघा लववुनि भूपें टेंकावा भूमीस ॥ ५३ ॥
डावा गुडघा उभाच ठेवुनि आसन्दीस करांनीं ।
स्पर्शुनि तीचें नृपें करावें अभिमन्त्रण मत्रांनीं ॥ ५४ ॥
" हे आसन्दी ! बसोत तुजवर अग्नी, सविता, सोम ।
इन्द्र, बृहस्पति, विश्वेदेव हि देउंत मजला क्षेम” ॥ ५५ ॥
अभिषेकविधी करणारा मग मत्र ह्मणे शान्तीचा ।
स्वयें ह्मणोनी राजाकरवी करवी पाठ तयाचा ॥ ५६ ॥
“हे उदकांनों! कृपादृष्टिनें मजला तुझीं पहावें ।
तुमच्या शान्त तनूनें माझ्या गात्रांतें स्पर्शावें ॥ ५७ ॥
तुमच्या ठायीं असति अग्नि जे त्यांतें मी आवाहीं ।
कान्ती, शक्ती, ओजहि तैसें द्यावें मजला त्यांहीं" ॥ ५८ ॥


 १ व्याघ्रचर्मणाऽऽस्तृणात्युत्तरलोम्ना प्राचीनग्रीवेण क्षत्रं वा एतदारण्यानां पशूनां यदूव्याघ्रः । २ शिवेन मा चक्षुषा पश्यतापः शिवया तन्वोपस्पृशत त्वचं मे । सर्वा॑ अग्नीँ रप्सुषदो हुवे वो मयि वर्चो बलमोजो नित्त ॥