Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सर्ग १]
इन्द्राभिषेक.


मोठ्यांमध्ये मोठा तूं बा, धमें प्रजेस शास्ता ।
प्रसवुन तुजला धन्य जाहली कल्याणी तव माता ॥ ४३ ॥
परमेशाच्या आज्ञेनें मी अभ्वींच्या बाहूंनीं ।
इन्द्रा तुजला अभिषिश्चितसे पूषाच्या हस्तांनीं ॥४४ ॥
अग्नितेज, रविकान्ति, आत्मबल हें जल तुजला देवो ।
शक्ति, श्री, यश, अन्नसमृद्धी अखण्ड तुजला होवो” ॥ ४५ ॥
मुलगा, नातू, पणतू यांसह नांदुं सुखें ह्मणवोनी |
अभिषिञ्चियलें व्याहृतिमत्रं मग इन्द्रालागोनी ॥ ४६ ॥
अभिषिचियलें पुनश्च इन्द्रा मग अन्या देवांनीं ।
प्रत्येकाही दिशेस विधिनें यथोक्त त्या मत्रांनीं ॥ ४७ ॥
यानंतर जे क्षत्रिय राजे झाले त्यांस असाच ।
अभिषेकविधी केला ऋषिंनीं, मन्त्रभागही तोच ॥ ४८ ॥
श्रुतिमय इन्द्रा आसन्दी ती कल्पियली देवांनीं ।
उदुम्बराची क्षत्रिय-भूपां सांगितली वेदांनीं ॥ ४९ ॥
टीच उंचिच्या चार खुरांवर गातीं मुंडा हात ।
चौबाजूंनीं चार असावीं, मापें हीं शास्त्रोक्त ॥ ५० ॥


 १ महान्तं त्वामहीनां सम्राजं चर्षणीनाम् । देवी जनित्र्यजीजनद्भद्रा जनित्र्यजी- जनत् । २ देवस्य त्वा सवितुः प्रसवेश्विनोर्बाहुभ्यां पूष्णो हस्ताभ्यामग्नेस्तेजसा सूर्यस्य वर्चसेन्द्रस्येन्द्रियेणाभिषिञ्चामि बलाय श्रियै यशसेन्नाद्याय । ३ औदुंबरी आसन्दी तस्यै प्रादेशमात्राः पादाः स्युररत्निमात्राणि शीर्षण्यान्यनूच्यानि मौअं विवयनं व्याघ्रचर्मावस्तरणम् ।