Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राज्यारोहण.

[ सर्ग १


इन्द्राचें गुणकीर्तन यापरि देवमुखानें झालें ।
प्रजापतीनें मग मत्रानें इन्द्रा अभिमत्रियलें ॥ ३५ ॥
"नियमा करुनी सत्संकल्पा इन्द्रानें मनिं धरिलें ।
आरोहण या आसन्दीवर साम्राज्यास्तव केलें” ॥ ३६ ॥
आसन्दीच्या पुढे उभा मग पश्चिमाभिमुख ठेला ।
प्रजापती अभिषेक-साधनीं सज्ज तत्क्षणीं झाला ॥ ३७ ॥
उदुंबराची सपर्ण शाखा आर्द्र, दर्भ सोन्याचे ।
इन्द्र-शिरावर धरुनि दाखवी कौतुक अभिषेकाचें ॥ ३८ ॥
उदुम्बराचा चमेस करूनी द्रव्यें आठ तयांत ।
दहीं, तूप, मध, मदिरा, दूर्वा, अंकुर, हिरवें गवत ॥ ३९ ॥
उन्हांत पाउस पडतो तें जल, द्रव्यें ऐशीं आठ ।
घालुनि अभिषेकितां करी तो या मत्रांचा पाठ ॥ ४० ॥
“औषेध सर्व व्याधीवरचें अभिषेकोदक शान्त ।
राष्ट्रातें हें वृद्धिस्थितिकर, केवल विनाशरहित ॥ ४१ ॥
 इन्द्र, सोमही, वरुण, यम, मनू जयें तयें तुज आज ।
 अभिषिञ्चतसे तूं हो सकलां राजांचा अधिराज ॥ ४२ ॥


 १ निषसाद धृतव्रतो वरुणः पस्त्याखा २ चमचा. ३ इमा आपः शिवतमा इमाः सर्वस्य भेषजीः । इमा राष्ट्रस्य वर्द्धनीरिमा राष्ट्रभृतोऽमृताः । ४ याभि- रिन्द्रमभ्यषिञ्चत्प्रजापतिः सोमं राजानं वरुणं यमं मनुम् । ताभिरद्भिरभिषिञ्चामि त्वामहं राज्ञां त्वमधिराजोभवेह |