Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सर्ग १]
इन्द्राभिषेक.

माहाराज्यहि त्या लोकीं मज आधिपत्य चिरकाल ।
त्यांजमुळें मज अपारतन्त्र्यहि त्या लोकीं साधेल” ॥ २७ ॥
या अर्थाचे मत्र पदुनियां इन्द्र अधिष्ठित झाला ।
बघुन तयातें विश्वेदेवीं विचार ऐसा केला ॥ २८ ॥
लोकीं जैसे गुण राजाचे बन्दिजन स्तविताती ।
गुणख्यापनें ऐशा उपजे शत्रूंच्या मनिं भीती ॥ २९॥
विचार ऐसा करुनि सभोंतीं इन्द्राच्या ते जमले ।
तद्गुर्णेकीर्तनिं चित्त, वदनही तेव्हां त्यांचें रमलें ॥ ३० ॥
“सम्राड्रूपी आहे ह्मणुनी धर्में जन शासाया ।
स्वयें भोग भोगाया तैसा भोग-समृद्धि कराया ॥ ३१ ॥
स्वतंत्र आपण राहुनि भूपां माण्डलिकां रक्षाया ।
परमेष्ठीचा अंश ह्मणोनी पारमेष्ठय सेवाया ॥ ३२ ॥
समर्थ सर्वां क्षतापासुनी स्वविक्रमें पाळाया ।
असे लाभला स्वामी प्राण्या, प्रजेप्रती हा राया ॥ ३३ ॥
अरींस जेता, असुरां हन्ता, वेदांचा हा गोप्ता ।
धर्माचा हा त्राता, झाला देवांचाही नेता " ॥ ३४ ॥


 १ इतरांहून श्रेष्ठत्व. २ तं विश्वेदेवा अभ्युदक्रोशन्निमं देवा अभ्युत्कोशत सम्राजं साम्राज्यं भोजं भोजपितरं स्वराजं खाराज्यं विराजं वैराज्यं राजानं राजपितरं परमेष्टिनं पारमेष्टयं क्षत्रमजनि क्षत्रियोजनि विश्वस्य भूतस्या- धिपतिरजनि विशामत्ताजनि पुरां भेत्ताजन्यसुराणां हन्ताजनि ब्रह्मणो गोप्ताजनि धर्मस्य गोप्ताजनीति. ३ प्रजापतीचे लोकीं वास्तव्य |