Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राज्यारोहण.

[ सर्ग १


सामांची ती तिरपी विणकर केली आसन्दीस ॥ १७ ॥
या दोन्यांच्या मधलीं छिद्रे याजुष मन्त्रीं भरलीं ।
कीर्तिरूप ती मऊ बिछाइत बसावया आंथरली ।। १८ ।।
श्रीची केली उशी तेधवां इन्द्रा शिर टेंकाया ।
धरुनि बैसले दोन दोन सुर आसन्दीच्या पायां ॥ १९ ॥
सविता एका, दुज्या बृहस्पति पूर्वेच्या पदिं बसले ।
वायू, पूषा या देवांनी पश्चिमपद सांवरिलें ॥ २० ॥
मित्रावरुणीं उसें पायथें अनुक्रमें रक्षियलें ।
अश्विबन्धुंनीं दो बाजूंच्या गातां सांभाळीलें ॥ २१ ॥
होतां यापरि सर्व सिद्धता, मङ्गल मत्रा पढला ।
इन्द्र अनन्तर यथाविधी त्या आसन्दीवर चढला ॥ २२ ॥
"वसू चढुंत या आसन्दीवर देउंत मज साम्राज्य ।
रुद्रहि माझ्या आधीं चढुनी देउंत मजला भौग्य ॥ २३ ॥
आदित्यहि ते आधीं चढुनी देवोत स्वाराज्य |
विश्वेदेव हि हीवर चढुनी मज वितरूंत वैराज्य ॥ २४ ॥
पवित्र ऐशा आसन्दीवर चढूनि अगोदर माझ्या |
साध्ये आणखी आय देव ते देउंत मजला राज्या ॥ २५ ॥
मत् तसे अङ्गिरे देव ह्या आसन्दीवर चढुनी ।
परमेष्ठीच्या लोकीं वसती देउत मजलागोनी ॥ २६ ॥


 १ धर्मानें प्रजेचें पालन. २ उपभोग्य वस्तूंची समृद्धि ३ खातंत्र्य. ४ इतर राजांहून अधिक योग्यता. ५,६,७,८ देवांचे गण.