Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सर्ग १]
इन्द्राभिषेक.

रत्नशिलातलं बैसुनि कोणी सुखसंलाप करीती ।
कोणी काञ्चनपद्मकिसलयास्तरणीं निद्रा घेती ॥ ९ ॥
आगर केवळ सर्व सुखांचें ऐशा या सुरभुवनीं ।
विधिसह होते देव बैसले यथोचित स्वस्थानीं ॥ १० ॥
तेव्हां सहजचि गोष्ट निघाली कीं सुरलोकांमाजी ।
रोजा कोणी तरी असावा सर्व जाहले राजी ॥ ११ ॥
देवांमध्यें इन्द्राइतुका ओजस्वी नच कोणी ।
बळकट, काटक, कनवाळूही वारिल येतां बाणी ॥ १२ ॥
संमति यापरि सर्वजणांची पडतां अभिषेकाचा ।
करावया संभार लागले, तोटा तेथ कशाचा ? ॥ १३ ॥
इन्द्रालागीं बसावयास्तव आसेन्दी देवांनीं ।
वेदमन्त्रमय कल्पियली ती अद्भुत त्यांची करणी ॥ १४ ॥
बृहद्रथन्तर दोन कल्पिले पाय तिचे ते पुढचे ।
वैरूपे, वैराजें केले पाय मागचे तीचे ॥ १५ ॥
उशा, पायथ्या शाक्कर, रैवत ही जोडी बैसविली ।
नौधस - कालेयाचीं गातीं बाजूला योजियलीं ॥ १६ ॥
ऋग्मन्त्रांची दोरी विणिली अग्र करुनि पूर्वेस ।


 १ ते देवा अब्रुवन्सप्रजापतिका अयं वै देवानामोजिष्टो बलिष्ठः सहिष्ठः सत्तमः पारयिष्णुतम इममेवाभिषिञ्चामहा इति । ऐ. ब्रा. अध्याय ३८ खण्ड १.२ लहा- नसा पलंग अथवा चौपाई. * हीं वैदिक छंदांची नांवें आहेत.