Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उपोद्घात.

राज्य ह्मणति ती धार्मिक संस्था ऐशी उदात्त नीती ।
श्रीख्रिस्तमती मान्य जाहली तीच पाळिली रीती ॥ १६ ॥
(४) या विधिचें ह्या दोन्हीं राष्ट्रीं शुद्ध भावनासाम्य ।
विचारशीला कवणा मनुजा न वाटतें हें रम्य ॥ १७ ॥
व्यवहाराचें दुजें अंग जें या विधिचें, उपचारीं ।
यथाविभव तें पूर्ण होतसे, तें जनमानसहारी ॥ १८ ॥
पाश्चात्य तशी प्राच्य पद्धती या नृपसंस्काराची ।
दावायतें येथ गुंफिलीं कथानकें दोहींचीं ॥ १९॥
पहिल्या सर्गी अभिषेकविधी समंत्र देवेन्द्राचा ।
दुसऱ्यामध्यें वानियला तो दाशरथी रामाचा ॥ २० ॥
तिसन्यामध्ये युधिष्ठिराचा, पुढतीं जार्जनृपाचें
किरीटधारण, रहस्य कथुनी त्या त्या विध्यंगाचें ॥ २१ ॥
पंचम सर्गी चक्रवर्तिचा तो दिल्ली दरबार ।
संक्षेपानें कथिला त्याचें कौतुक जनीं अपार ॥ २२॥
प्रसंग सुंदर परी लेखणी माझी हे बहु दुबळी |
कशा तरी म्यां चार गुंफिल्या भीत भीत या ओळी ॥ २३ ॥
आवडतां ह्या विषयगौरवें रसिकां थोड्या फार ।
मानिन त्यांच्या सौजन्याचें कौतुक मी साभार ॥ २४ ॥

}}



* The Coronation Service by the Lord Bishop of Madras.