Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राज्यारोहण.

(२) राजावांचुनि सर्वहि लोकां राहे भीती मोठी |
झणुनि निर्मिली भूप विभूती लोकरक्षणासाठीं ॥ ७ ॥
इन्द्र, वायु, यम, सूर्य, धनंजय, वरुण, सोम, वित्तेश
या देवांचा भूपाठाईं ठेवियला तेजोंऽश ॥ ८ ॥
नांदे मोठी नृपतिदेवता मनुष्यरूपें भुवनीं ।
बालहि राजा असतां त्यातें नावगणावें कोणीं ॥ ९ ॥
गर्जे ऐशी धर्मशासनीं आद्यमनूची वाणी ।
भूपति तितुका अंश विष्णुचा हें कथियलें पुराणीं ॥ १० ॥
भूपाविषयीं पूज्यभावना ही धर्में निर्मिली ।
तीच अबाधित लोकाचारी या देशीं दृढ ठेली ॥ ११ ॥
(३) किरीटधारण हा भूपाचा केवळ नच उपचार ।
परंतु पूर्वापार मानिला तो धार्मिक संस्कार ॥ १२ ॥
निग्रह तैसा अनुग्रह असे ईशाचा अधिकार ।
तो चालविण्या आज्ञा त्याची हाच खरा आधार ॥ १३ ॥
ईशप्रतिनिधि असे भूपती ऐसा शास्त्रिं विचार ।
आहे ह्मणुनी पाळियला हा तसाच लोकाचार ॥ १४॥
ऐहिक सत्ता वैभव सारें देणारा प्रभु तोच ।
प्रभुसेवेला अर्पण त्याचें नृपतिधर्म हा साच ॥ १५ ॥