Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
॥ श्री ॥
राज्यारोहण.
उपोद्घात.
(साकी. )

श्रीमत्प्रौढप्रताप आंगल - भूपतिकुलप्रवाल ।
पुणे मराठी ग्रालय ४३७ व नारायण दा. नों. ६९५
श्रीयुत जार्ज महाशय झाला ब्रितानियाभूपाल ॥ १ ॥
युवराजा तो असतां त्यानें दर्शन आह्मां दिधलें ।
कृपाकटाक्षे पाहुनि सर्वा प्रेमपाशिं वश केलें ॥ २ ॥
ईशकृपेनें त्यास पित्याच्या सिंहासनं आरूढ |
पाहुनि सहजचि मना वाटलें पुरलें मनिंचें कोड ॥ ३ ॥
 प्रिय आर्धी तो होता त्यांतचि दुधांत साखर पडली ।
राज्यश्रीची माळ तयाच्या कंठीं अमोघ सजली ॥ ४॥
युवराजपदीं असतां त्यानें दिधली सहानुभूती ।
भेट, असंशय चक्रवर्ति तो करील आतां प्रीती ॥ ५ ॥
आनंदीआनंद जाहला देशोदेशीं लोकां ।
गेले लक्षावधि जन बघण्या राज्यारोहणकुतुका ॥ ६ ॥