पान:रससूत्र (Rasasutra).pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाड्मयाचा विचार धर्माच्या संदर्भात करणारा भट्टनायक पहिला नव्हे. त्याच्याही पूर्वी ग्रीकांच्या मध्ये ही कल्पना मांडणारा एक विचारवंत प्लॉटिनस . म्हणून' आहे (इ. स. २०४ ते इ. स. २७७ ) प्लॉटिनस अरिस्टॉटलच्या कॅथार्सिसचे गूढ धार्मिक अनुभवाच्या आधारे स्पष्टीकरण देतो. तो म्हणतो कलांचा अनुभव ब्रह्मतादात्म्यासारखा असतो. कॅथार्सिस मध्ये देहनिजत्वादी भावाचे निवारण असते. व म्हणून तेथे आत्म्याचे शुद्धीकरण असते. आत्म्याच्या शुद्धीकरणामुळे व देहभाव निवारणामुळे गूढ अनुभूती आणि काव्यानंद ह्यांची जात एकच ठरते. वेळोवेळी 'काव्याविषयी ममत्व असणारे धार्मिक ह्या पद्धतीने वाड्मयाचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करणार. त्या परंपरेतील भट्टनायकही एक असा त्याचा अर्थ आहे.
{{gap}रस म्हणजे आत्मा ( म्हणजे ब्रह्म) हा मुद्दा श्रुतीच्या आधारे मान्य केला की त्यातून रसास्वाद म्हणजे ब्रह्मास्वाद हा निर्णय आपोआप निष्पन्न होतो. ब्रह्मास्वादात निजत्व निरास असतो (ही उपनिषदांची प्रसिद्ध कल्पना आहे.) म्हणून सांख्यस्वादातही निजत्वनिरास असतो. हा निजत्वनिरास जर काव्यनाटकामुळे सिद्ध होणार असेल तर काव्यात शब्दाच्या ठिकाणी आणि नाट्यात अभिनयाच्या ठिकाणी ही शक्ती मान्य करणे भागच आहे. हेच भट्टनायक सांगतो. दिसताना असे दिसते की तो शब्दांच्या व्यापाराचा विचार आरंभी करतो. तेथून ब्रह्मास्वादाकडे जातो. पण हे दिसणे वेदांत्याच्या मिथ्या प्रपंचाइतके मिथ्या आहे. नाटयात एक प्रकारचा अभिनय असतो, त्यापैकी एक वाचिक अभिनय आहे. सगळा शब्दव्यापार, हया वाचिक अभिनयात येतो. हया वाचिक अभिनयाचे कार्य काय तर निजत्व-निरास करणे. वाचिक अभिनयाला, आगतिक, सात्त्विक, आहार्य हया तीन अभिनयांची जोड मिळाली तर काय होते? निजत्व-निरास होतो. आहार्य अभिनय म्हणजे लाकडी तलवार, उद्यान म्हणून असणारा पडदा, नाटकी रामाचा खोटा मुकुट, हयांच्यामुळे निजत्व निरास का व्हावा? आणि शब्दांनी तरी निजत्व निरास का व्हावा? दशरथपुत्र राम अतिशय पराक्रमी व शूर आहे हया वाक्यामुळे फक्त लौकिक बोध होतो. मात्र दाशरथी सिंह आहे असे म्हटले की निजत्व निरासाला आरंभ होतो हे प्रमाण कसे मानावे? गुण आणि अलंकारांच्या मुळे निजत्व-निरास व्हावा याला काही कारण आहे का ? खरे म्हणजे हया पद्धतीने भट्टनायकाला प्रश्न विचारणेच बरोबर नाही तो म्हणणार काव्यामुळे रसभोग आहे हे सर्वमान्य आहे. एकतर मुद्दा अनुभव सिद्ध आहे. दुसरे म्हणजे याला मुनिवचन प्रामाण्य आहे. इथून आपण आरंभ करू. वेगळ्या भाषेत सांगायचे तर भट्टनायक जे व्यापार प्राधान्य मानतो आहे, जे शब्दांचे परिणाम सांगतो आहे त्याचे कारण धर्म आहे.
 हा निजत्व निरासाचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी भट्टनायक शब्दांचे तीन व्यापार मानतो शास्त्रातही शब्द व्यापार असतोच पण शास्त्र शब्दप्रधान असतात, मीमांसक वेदातील


८६