पान:रससूत्र (Rasasutra).pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शब्दांना महत्त्व देता यावे म्हणून, शब्द नित्य समजत व शब्दांच्या ठिकाणी अर्थबोध करण्याची शक्ती मानत. व याला अनुसरून शास्त्र शब्दप्रधान असते हा मुद्दा आहे. आख्याने व कथा अर्थप्रधान असतात. म्हणजे तिथे वाच्यार्थासह तात्पर्यालाही महत्त्व असते. हा सगळा व्यवहार शब्दांच्या ठिकाणी असणाऱ्या अभिधाशक्तीमुळे चालतो. काव्यात असणारे शब्द सामान्य अभिधेने युक्त नसून विचित्र अभिधेने युक्त असतात. हया ठिकाणी अभिधेला विचित्र म्हटले आहे. त्यामागे एक परंपरा आहे. रामायण महाभारतात ठिकठिकाणी विचित्र पदरचनेचा उल्लेख आलेला आहे. तेथून क्रमाने पदरचना विचित्र नसते तर अर्थबोध करणारी शक्ती विचित्र असते ही कल्पना विकसित झालेली दिसते. हया विचित्र अभिधेत पहिल्या टप्प्यावर वाच्यार्थ बोध होतानाच दोषाभाव, गुण व अलंकार असतात असा एक मुद्दा आहे. हया मुद्दयाचा खरा अर्थ असा आहे की.वक्रोक्ती, रीती इत्यादी ज्या कल्पना भट्टनायकासमोर आहेत त्या तर तो अभिधेच्या पहिल्या टप्प्यांवरच्या आहेत असे मानतो.

दुर्दैवाने हा लेख इथेच खंडित झाला आहे.

लेखनकाल : नोव्हेंबर-डिसेंबर १९८१

-संपादक



८७