पान:रससूत्र (Rasasutra).pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



निर्माण करून ठेवणारे आहे. भट्टनायकाचा पहिला निर्णय हा आहे की नाट्यास्वाद व नाटयप्रतीती ही ब्रह्मास्वादासारखी आहे. हया निर्णयावर दोन भिन्न बाजूंनीच येता येते. एकतर सांख्यकारिकेत नाट्याचा प्रेक्षक तटस्थ पुरुषासारखा व त्याची अवस्था सत्वोद्रेकासारखी असते असे म्हणण्यास आधार आहे व हयाच पद्धतीने वेदांती स्पष्टीकरण देत होते. प्राक्तन दौस्थ्याचा निरास, आपण प्रकृति-भिन्न आहोत हे भाव आणि निजत्वनिरास हया कल्पना सारख्या सारख्या आहेत. वेदान्त परंपरा ज्या पद्धतीने विचार करीत होती, त्या पद्धतीचे अनुसरण करीत सांख्यांची भूमिका वेदांताच्या परिभाषेत मांडली की भट्टनायकाचे मत उपलब्ध होते. भट्टनायकापूर्वी हया पद्धतीने काव्यशास्त्र विवेचन करणारा एखादा महत्त्वाचा विचारवंत झाला नसेल पण धार्मिक तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात हया भूमिकेला परंपरा होती. दुसऱ्या बाजूने यावयाचे तर रस म्हणजे काय ? हा प्रश्न विचारून येता येते. कारण, रस हा उपनिषदांचा प्राचीन शब्द आहे. नाट्यशास्त्र आजच्या ऐतिहासिकांना व प्राचीन पारंपरिकांना कुणालाही तैत्तरियोपनिषदांच्यापेक्षा प्राचीन मानता येणे शक्य नाही.
  आज भट्टनायकाचे विवेचनही त्याच्या स्वतःच्या शब्दांत उपलब्ध नाही. त्याच्या पूर्वसूरींची नाटयचर्चाही उपलब्ध नाही. पण नाट्यशास्त्रातील रस हया कल्पनेचा उपनिषदाशी संबंध काय? या प्रश्नाला प्राचीन विचारवंत कोणते उत्तर देत असतील हे आपण सांगू शकतो. ते प्राचीन विचारवंत म्हणणार भरतमुनी जी मते सांगत आहेत ती प्रजापतीची म्हणजे ब्रह्मदेवाची आहेत. ब्रह्मदेवानेच रसांचा उपदेश केला हे नाट्यशास्त्रावरूनच स्पष्ट आहे. ब्रह्मदेवाने सर्व वेदांच्या आधारेच नाटयवेद निर्माण केलेला आहे. म्हणून श्रुती ज्याला रस म्हणते तो रस व नाट्यशास्त्रातील रस हे दोन निराळे असू शकत नाहीत. शिवाय नाटयाची प्रतीती तुम्ही कशी सांगणार ? ती. प्रीतिकर सुखकर विश्रांतीस्वरूप अशीच सांगायची ना ? हया सर्व ठिकाणी सुखाचा अनुभव घेणारा कोण आहे ? हे जडजगत्. सुखाचा आस्वाद घेऊ शकत नाही. सुखाचा आस्वाद घेणारा चैतन्यस्वरूप आत्माच मानणे भाग आहे. म्हणूनही 'रस' शब्द श्रतीच्या अभिप्रायाने स्वीकारणे भाग आहे. भट्टनायकापूर्वी हया भूमिकेचे काही ठसे आपल्याला दिसतात.
  रुद्रटाने आपल्या काव्यालंकारात आचार्यांनी मधुर आदींच्या प्रमाणे हे असल्यामुळे हयांनाही रस म्हटले आहे. असा उल्लेख केला आहे. (१२।४) हा उल्लेख निश्चितच भट्टनायकापूर्वीचा आहे. ज्याप्रमाणे मधुर-तिखट आंबट-गोड आदी रस असतात त्याप्रमाणेच हे शृंगारवीरादी रस आहेत. इतकाच हया भूमिकेचा अर्थ नाही. मधुर-तिक्तादी रस आनंददायक आहेत तसे काव्य नाटकांतील रस आहेत असाही ह्याचा अर्थ आहे. नाटयास्वादाचा षाडूवादी रसाशी सादृश्य संबंध नाटयशास्त्रातच सांगितलेला आहे. रुद्रट हा हया ठिकाणी शंकराचार्याचे मत


८४