पान:रससूत्र (Rasasutra).pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जुनी प्रथा आहे. ब्रह्मसूत्रकार सांगतात की जगताच्या आदिकारणाने ईक्षण केले, असे प्रतिपादन करणारी श्रुतिवचने सांख्य गौण म्हणजे उपचार मानत. सांख्यांनी रुढ केलेला उपचारवाद, पुढे वेदांत्यांनी आपल्या पद्धतीने विकसित केलेला आहे. सांख्याची ही भूमिका पूर्णपणे लौकिकवादी आहे. लौकिकात बाहय विषयाच्यामुळे सुख दुःख निर्माण होते, तसे नाटकात विभाववादींच्यामुळे होते. ही भूमिका उत्पत्तिवादीही आहे. स्थायीभाव प्रेक्षकांच्या ठिकाणी उत्पन्न होतात असेच ही मंडळी सांगतात. म्हणजे ही भूमिका प्रेक्षकगत रसाची उत्पत्तिवादी लौकिक भूमिका आहे. लौकिक जीवनात जसे भाव उत्पन्न होतात तसेच नाटयस्वादात होतात काय ? जर दोन्हीत काही फरक नसेल तर येथे विभावादींची गरज का लागावी ? या प्रश्नाचे उत्तर अनुमानाने घ्यावे लागेल.
 भोजाने मांख्यांचे एक मत नोंदविलेले आहे. ह्या मतानुसार काव्यादिकांच्या आस्वादाने जो रम निर्माण होतो तो हृदयातच सुप्त असतो. भोजाने उल्लेखिलेले हे मन अभिनव भारतीतील मताचाच एक भाग आहे. सांख्य हे आरंमवादी नसून अभिव्यक्तीवादी आहेत. कारणातच कार्य सुप्त असते, ते निमित्ताने व्यक्त होते, असे सांख्य मानतात. तेव्हा उत्पन्न होणारे स्थायी भाव हृदयात आहेत, सुप्त आहोत, ते व्यक्त होतात, असे सांख्यांना म्हणणे भाग आहे. हा स्थायी भावच रस आहे, म्हणून रसही हृदयात सुप्त होता, तो व्यक्त झाला असे म्हणावे लागेल. लौकिक जीवनात ज्या भावना उत्पन्न होतात. त्याही हृदयात सुप्त असतातच. पण लौकिक जीवनात ज्या साधनांच्यामुळे, ज्या हेतूने, भाव निर्माण होतात त्यापेक्षा काव्यव्यवहारात, नाट्य व्यवहारात, साधने व हेतू भिन्न आहेत. ह्या साधन प्रयोजन भेदांमुळे भावाच्या स्वरूपात भेद होतो असे जर सांख्यांनी म्हटले तर जो लौकिक पक्ष आहे त्याचे अलौकिक पक्षात रूपांतर होऊ शकते.
 मांख्याची ही भूमिका नाटयशास्त्राची अभिप्रेत भूमिका आहे असे कुणीच म्हणणार नाही. एक स्वतंत्र भूमिका म्हणूनही हया भूमिकेची मार्मिकता विवाद्य राहील पण हया भूमिकेचे दोन कारणांच्यामुळे महत्त्व आहे. ही भूमिका, शंकुकाप्रमाणे नाटयास्वादाचे स्पष्टीकरण करतानाही निर्माण होत नाही किंवा लोल्लटाप्रमाणे नाट्यशास्त्राची संगती लावतानाही उपपन्न होत नाही. आपली दर्शनक्षेत्रातील भूमिका वाङमयक्षेत्रावर लादण्याचा हा प्रयत्न आहे. ज्याप्रमाणे यज्ञकर्म निर्दोष पार पाडले की स्वर्गसुख व अदृश्य निर्माण होते त्याप्रमाणे ठरलेला प्रयोग पार पडला की रस निर्माण होतो; अमे मत जर मीमांसकांनी मांडण्याचा प्रयत्न केला तर आपण काय म्हणू ? नेच मांख्यांच्या या भूमिकेविषयी म्हणावे लागेल. पुढे शैवांनी उत्तरमीमांसा, काव्यशास्त्रावर लादण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्या प्रवृत्तीचा हा आरंभ आहे. दुसरे म्हणजे रसनिर्मिती होत नसते. रस सुप्तपणे हृदयातच असतोच. तो फक्त व्यक्त

७७