पान:रससूत्र (Rasasutra).pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खात्री देता येत नाही. 'हृदयदर्पण' व 'सहृदयदर्पण' हे दोन वेगळे ग्रंथ आहेत की एकाच ग्रंथाची ती दोन नावे आहेत असा एक वाद आहे आणि भट्टनायक, भरतनाटयशास्त्राचा टीकाकार आहे, की नाही असाही एक वाद आहे. कारण अभिनवगुप्तांनी आपल्या नाटयशास्त्रटीकेत भट्टनायकाचा फार क्ंवचित उल्लेख केलेला आहे रसाध्याय सोडल्यास पहिला अध्याय व २७ वा अध्याय येथेच फक्त भट्टनायकाचा उल्लेख आहे. विशेषतः सिद्धी अध्यायातील उल्लेख पाहिला, तर असे दिसते की भट्टनायकाचा ग्रंथ पद्यमय होता. ते गद्यभाष्य नव्हे. ह्यावरून विद्वानांचे बहुमत असे की हृदयदर्पण हे नाट्यशास्त्राचे भाष्य नव्हे. ह्या ग्रंथाचे मुख्य प्रतिपाद्य ध्वनिखंडन हे होते. नाटयशास्त्राचा विचार तिथे आनुषंगिक होता. ह्या सर्व चर्चेत मतभेद दाखविण्याजोगे फारसे काही नाही. फक्त एका स्थळाकडे अभ्यासकांचे प्रायः दुर्लक्ष झालेले आहे तिकडे मी लक्ष वेधू इच्छितो. बहुतेक अभ्यासक असे गृहीत धरून चालतात की संगीत रत्नाकरकारांनी भरत नाट्यशास्त्राचे व्याख्याकार म्हणून जी नावे दिलेली आहेत त्यात मट्टनायकाचा उल्लेख नाही. हे गृहीत चुकीचे आहे. रत्नाकरकारांनी अभिनवगुप्तासह एका भट्टचा उल्लेख केलेला आहे. तो भट्टनायकाचा आहे. (रत्नाकर १/१९) संगीत रत्नाकरात भट्टनायकाचा केवळ भट्ट म्हणून ७/५३४ ह्या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा उल्लेख आहे. विषय हस्तप्रचाराचा चालू आहे. शारंगधर स्वतः १५ प्रकारचा हस्तप्रचार मानतात. भरत तीन प्रकारचा हस्त प्रचार मानतात. काही जण हस्तप्रचार पाच प्रकारना मानत. भट्टांचे म्हणणे असे आहे की भरताच्या तीन प्रकारच्या हस्तप्रचागत, हे पाच प्रकार अंतभूत आहेत. संगीत रत्नाकराचा टीकाकार सिंहभूपाल, स्पष्टीकरण देताना असे सांगतो की भट्ट म्हणजे भरताचे टीकाकार भट्टनायक होत. ह्या सिंहभपालाच्या उल्लेखामुळे तीन बाबी ठरतात. एक म्हणजे रत्नाकरकार भट्टनायकांना भट्ट म्हणतात, ते भट्टनायकाला भरताना व्याख्याकार मानतात, दुसरे म्हणजे चौदाव्या शतकातील सिंहभूपालासमोर भट्टनायकाचे अन्यत्र उपलब्ध नसणारे विवेचन आहे. तेव्हा हृदयदर्पण त्यालाच उपलब्ध असावा. मग काणे म्हणतात त्याप्रमाणे रसप्रदीपकारालाही १६ व्या शतकात हा ग्रंथ उपलब्ध असणे शक्य आहे. तिसरे म्हणजे भट्टनायकाने आपल्या ग्रंथात नृत्याभिनयाचाही विचार केला होता.
 हयामुळे भट्टनायक नाटयशास्त्राचा पद्धतशीर भाष्यकार ठरेलच असे नाही, पण त्याचा पद्यमय ग्रंथ नाटयशास्त्रातील सर्व विषयांचा आढावा घेणारा, विवेचन करणारा ठरेल. याग्वेरीज या ग्रंथात ध्वनिखंडनही विस्ताराने असेल. म्हणजे ही एक प्रकारची व्याख्याच झाली. या भट्टनायकाचा काळ कोणता ? हया बाबत निश्चित बाब ही आहे की तो आनंदवर्धनाच्या नंतरचा लेखक आहे. कारण त्याचा ग्रंथ सर्वसामान्य ध्वनिकल्पनेचे खंडन करणारा नसून आनंदवर्धनाच्या विशिष्ट भूमिकेचे

७४