पान:रससूत्र (Rasasutra).pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारतीय परंपरेतील प्रमुख चित्र विचार काव्य नाट्य विचारांचा अनुगामी आहे. तो नाटयविचारातील कल्पनांची उसनवारी करतो. चित्र विचारातून नाटय विचार प्रत्यक्षपणे, उचल करीत नाही.
 एक स्वतंत्र विचार म्हणून या भूमिकेकडे पाहिले तर तिच मुख्य मुद्दा अलौकिक प्रतीती हा आहे. ही प्रतीती बोधाची असो वा हा भाव प्रत्ययाची असो, दोन्हीचे स्थान या मीमांसेत एकच आहे. बोध, ज्ञान आणि भाव यांना एकच दर्जा देणारी ही मीमांमा आपणास वाङ्मयाचे काही गहन रहस्य सांगील असे नाही. ही भूमिका चित्रात अलौकिक प्रत्यक्ष का मानते तर लिंगअनुमान-अनुमेय ही त्रिपुटी लौकिक अनुमानात असते तशी चित्रात नसते. म्हणून केवळ नेहमीच्या पद्धतीनं घटना समजावून सांगता येत नाहीत या कारणासाठी अलौकिकाच्या कल्पनेचा आश्रय घेणे बरोबर ठरणार नाही. चित्र क्षेत्रातील कलाकृती, कारागिरी, विफल कलाकृती, उपयोगी नकाशे, हे सारेच या अलौकिक प्रतीतीच्या कक्षेत येते. एक ग्राहय भूमिका म्हणून या भूमिकेकडे पाहायचे नसून नव्या कल्पनांना जन्म व समर्थन देणारी भूमिका म्हणूनच हिच्याकडे पाहिले पाहिजे.
 शंकुक अनुमितीवादी नसून तसा तो गाजला. पण ह्या नैय्यायिक परंपरेत एक विवेचक खरोखर असा आहे. जो अनुमितीवादी आहे. आपण अनुमितीवादी आहो हयाचा त्याला अभिमान आहे. हा लेखक म्हणजे महिमभट्ट. महिमभट्ट हा अभिनव गुप्तांच्या किंचित उत्तरकालीन असा अकराव्या शतकाच्या उत्तरार्धातील लेखक आहे व त्याचा ग्रंथ त्याने आपल्या प्रौढ नातवाच्यासाठी लिहिलेला आहे. तेव्हा अभिनवगुप्ताच्या अंतकाळी महिमभट्ट चाळिशीच्या सुमाराचा असणे सहज शक्य आहे. आपण भट्टनायकाचा दर्पणग्रंथ आणि ध्वन्यालोकाची चंद्रिका टीका पाहिली नाही, असा प्रास्ताविक श्लोकातच महिमभट्ट उल्लेख करतो. हे खरे म्हणजे आपणा पूर्वीच्या ध्वनिसंप्रदाय विरोधकांना एक प्रकारचे दर्पयुक्त नमन आहे. आपणांपुर्वीच्या प्रमुख ध्वनि-विरोधकांचा उल्लेख तर करायचा, पण त्यांच्यापेक्षा आपले विवेचन अगदी निराळे आहे असे सुचवायचे असे महिमभट्टाचे हेतू दिसतात. त्याच्या हया उल्लेखावरून महिमभट्टाला घाई झाली होती, अगर त्याने फारसे चिंतन न करता ग्रंथ लिहिला असे म्हणणे बरोबर होणार नाही. चंद्रिकाकार, ध्वनी तात्पर्यात घेत. भट्ट नायक भावकत्व मानी. या मतांचे खंडन महिमभट्टापूर्वीच झालेले होते. त्यामुळे त्याला हे ग्रंथ विचारात घेण्याची गरज नव्हती, हे स्पष्ट आहे. त्याने आपल्या ग्रंथाची काळजीपूर्वक मांडणी केलेली आहे. काव्यशास्त्रज्ञांनी त्याच्या विषयी फारसा आदर दाखविलेला नसला तरी वेदांताचे महापंडित श्रीहर्ष यांनी मात्र खंडन-खाद्यात त्याचा आदरपूर्वक उल्लेख केलेला आहे.
 महिमभट्टाचा प्रमुख सिद्धान्त, अनुमानवादाचा आहे. अनुमानाला महत्व देण्याची


६९